*6 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणारा दुसरा टप्पा
*केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन
ठाणे 6 : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, माजिवडा मानपाडा, मुंब्रा, दिवा, उथळसर, वर्तकनगर, लोकमान्यनगर या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी या विकसित भारत यात्रेला भेट देऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती घ्यावी, नोंदणी करावी, तसेच आरोग्य शिबिराचाही लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सदरची विकसित भारत यात्रा देशभरात सुरू असून या यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पी एम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधारकार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी.एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन ई- बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती स्टॉलवर देण्यात येते, तसेच नोंदणीही केले जाते.
तसेच आरोग्य शिबिर, क्षयरोग तपासणी व औषधोपचार शिबिर असे विविध उपक्रम यात्रेच्या ठिकाणी राबविले जातात. विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीपर्यत राबविला जाणार असून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण 36 ठिकाणी ही यात्रा जाणार आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक
6 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- गणपती विटावा, शाळा क्र. 72 कळवा,
दु. 2 ते 5.30 वा- विटावा टॅक्स ऑफिस
स. 10 ते 1.30 – कासारवडवली, राममंदिर, माजिवडा मानपाडा
दु. 2 ते 5.30 – ओवळा नाका, हनुमान मंदिर, माजिवडा मानपाडा
7 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- कळवा एस.टीवर्कशॉप गेट
दु. 2 ते 5.30 वा- कळवा रेल्वेस्टेशन पश्चिम
स. 10 ते 1.30 – पानखंडा, ओवळा, महापालिका कार्यालयाजवळ
दु. 2 ते 5.30 – टीएमसी शाळा क्र. 62 कासारवडवली.
8 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- अन्वर कंपाऊड, सैनिक नगर, मुंब्रा
दु. 2 ते 5.30 वा- कौसा स्टेडियम
स. 10 ते 1.30 – दिवा रेल्वेस्टेशन पूर्व
दु. 2 ते 5.30 – एस.जी.एम स्कूल, आगासन रोड, दिवा
9 फेब्रुवारी– स. 10 ते दु 1.30- गणेशमंदिर रोड, नूरी बाबा दर्गा रोड, उथळसर
दु. 2 ते 5.30 वा- सिध्देश्वर तलावाजवळ, उथळसर
स. 10 ते 1.30 – घोलाईनगर, कळवा
दु. 2 ते 5.30 – भास्करनगर कळवा
10 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- हसमत चौक, देवरीपाडा, कौसा मुंब्रा
दु. 2 ते 5.30 वा- शादीमहल रोड, अमृतनगर
स. 10 ते 1.30 – देसाई गांव चौक
दु. 2 ते 5.30 – डायघर नाका
11 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- आनंदसावली को. ऑ.सो. उथळसर
दु. 2 ते 5.30 वा- टेकडी बंगला, पाचपाखाडी
स. 10 ते 1.30 – आतकोनेश्वर नगर, कळवा
दु. 2 ते 5.30 – वाघोबानगर, कळवा
12 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- विजयनगर कॉम्प्लेक्स, वाघबीळ
दु. 2 ते 5.30 वा- भूमी एकर्स, वाघबीळ
स. 10 ते 1.30 – सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, वर्तकनगर
दु. 2 ते 5.30 – गावंडबाग, उपवन
13 फेब्रुवारी – स. 10 ते दु 1.30- तारांगण सोसायटी, मानपाडा
दु. 2 ते 5.30 वा- सरस्वती कॉलेज, आनंदनगर, माजिवडा मानपाडा
स. 10 ते 1.30 – हत्तीपूल, शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, ठाणे
दु. 2 ते 5.30 – जयभवानी नगर, लोकमान्यनगर, ठाणे
14 फेब्रुवारी– स. 10 ते दु 1.30- कोकणीपाडा, टिकूजीनीवाडी, खेवरासर्कल, ठाणे
दु. 2 ते 5.30 वा- धर्मवीरनगर, तुलसीधाम, ठाणे
स. 10 ते 1.30 – ज्ञानोदय स्कूल चौक, सावरकरनगर, ठाणे
दु. 2 ते 5.30 – मैत्री टॉवर, काजूवाडी, ठाणे