Tuesday, January 21 2025 3:51 am
latest

विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद

गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात शासकीय यंत्रणेचे उल्लेखनीय यश

ठाणे, 18 :- भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत,याची खात्री करण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दि. 15 नोव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत पार पडणार आहे.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना आदींचा समावेश आहे. तसेच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, मातृत्व वंदना योजना, उज्ज्वला योजना विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ देण्यात येत आहे.
याशिवाय विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी विषयक विविध मार्गदर्शन करण्यात येत असून या यात्रेदरम्यान पीएम प्रणाम-रासायनिक खताला पर्यायी खतांचा वापर व व्यवस्थापन, माती परिक्षण आणि सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येते.
ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली आहे, ही माहिती पुढीलप्रमाणे–
अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण 3 हजार 748 लाभार्थ्यांपैकी 2 हजार 231 पुरुष तर 1 हजार 255 स्त्रिया व 262 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. सुरक्षा विमा योजना-241, जीवन ज्योती योजना-134, आरोग्य शिबिरामध्ये तपासणी-149, क्षयरोग तपासणी-90, सिकलसेल तपासणी-34, प्रधानमंत्री उज्वला योजना-59, लाभार्थी महिला-1 हजार 161, लाभार्थी विद्यार्थी-418, लाभार्थी स्थानिक खेळाडू-154, लाभार्थी स्थानिक कलाकार-46.
भिवंडी तालुक्यामध्ये एकूण 7 हजार 743 लाभार्थ्यांपैकी 4 हजार 099 पुरुष तर 3 हजार 637 स्त्रिया व 7 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. सुरक्षा विमा योजना-654, जीवन ज्योती योजना-406, आरोग्य शिबीरामध्ये तपासणी-582, क्षयरोग तपासणी-467, सिकलसेल तपासणी-459, प्रधानमंत्री उज्वला योजना-67, लाभार्थी महिला-183, लाभार्थी विद्यार्थी-213, लाभार्थी स्थानिक खेळाडू-152, लाभार्थी स्थानिक कलाकार-123.
कल्याण तालुक्यामध्ये एकूण 7 हजार 888 लाभार्थ्यांपैकी 2 हजार 993 पुरुष तर 4 हजार 887 स्त्रिया व 8 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. सुरक्षा विमा योजना-361, जीवन ज्योती योजना-218, आरोग्य शिबीरामध्ये तपासणी-4 हजार 463, क्षयरोग तपासणी-1329, सिकलसेल तपासणी-856, प्रधानमंत्री उज्वला योजना-201, लाभार्थी महिला-495, लाभार्थी विद्यार्थी-497, लाभार्थी स्थानिक खेळाडू-234, लाभार्थी स्थानिक कलाकार-149.
मुरबाड तालुक्यामध्ये एकूण 10 हजार 306 लाभार्थ्यांपैकी 4 हजार 379 पुरुष तर 5 हजार 552 स्त्रिया व 375 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. सुरक्षा विमा योजना-577, जीवन ज्योती योजना-385, आरोग्य शिबीरामध्ये तपासणी-965, क्षयरोग तपासणी-114, सिकलसेल तपासणी-64, प्रधानमंत्री उज्वला योजना-406, लाभार्थी महिला-401, लाभार्थी विद्यार्थी-180, लाभार्थी स्थानिक खेळाडू-0, लाभार्थी स्थानिक कलाकार-1.
शहापूर तालुक्यामध्ये एकूण 17 हजार 480 लाभार्थ्यांपैकी 9 हजार 966 पुरुष तर 7 हजार 514 स्त्रिया व 0 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. सुरक्षा विमा योजना-578, जीवन ज्योती योजना-314, आरोग्य शिबीरामध्ये तपासणी-3 हजार 945, क्षयरोग तपासणी-1 हजार 755, सिकलसेल तपासणी-1 हजार 101, प्रधानमंत्री उज्वला योजना-354, लाभार्थी महिला-774, लाभार्थी विद्यार्थी-696, लाभार्थी स्थानिक खेळाडू-354, लाभार्थी स्थानिक कलाकार-318.
ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 47 हजार 164 लाभार्थ्यांपैकी 23 हजार 668 पुरुष तर 22 हजार 845 स्त्रिया व 652 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला.
योजनांनिहाय लाभार्थी संख्या सुरक्षा विमा योजना-2 हजार 411, जीवन ज्योती योजना-1 हजार 457, आरोग्य शिबीरामध्ये तपासणी-10 हजार 104, क्षयरोग तपासणी-3 हजार 755, सिकलसेल तपासणी-2 हजार 514, प्रधानमंत्री उज्वला योजना-1 हजार 087, लाभार्थी महिला-3 हजार 014, लाभार्थी विद्यार्थी-2 हजार 004, लाभार्थी स्थानिक खेळाडू-894, लाभार्थी स्थानिक कलाकार-637 अशी आहे.