आमदार संजय केळकर आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली भेट
मंगळवारपासून लोकमान्य नगर परिसरात यात्रेचा प्रवास
ठाणे 12 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि नौपाडा भागात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मंगळवारी विकसित भारत संकल्प यात्रा लोकमान्य नगर भागात जाणार आहे. पहिल्या सत्रात कोरस टॉवर आणि दुसऱ्या सत्रात लोकमान्य नगर बस स्टॉप येथे या यात्रेचा मुक्काम असेल.
शुक्रवार ते सोमवार या काळात विकसित भारत संकल्प यात्रा ठाणे रेल्वे स्टेशन, घंटाळी नाका, मल्हार चौक, हरिनिवास सर्कल या भागात आयोजित करण्यात आली होती. घंटाळी नाका येथील कार्यक्रमात आमदार संजय केळकर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, राजेश मढवी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी भेट दिली. तेथे शपथही घेण्यात आली. नागरिकांनी आयुष्यमान कार्ड नोंदणी, आधार कार्ड अपग्रेडेशन, आरोग्य शिबीर आदी सुविधांचा लाभ घेतला.
आता ही यात्रा लोकमान्य नगर भागात जाणार आहे. १२ ते १४ डिसेंबर या काळात वेगवेगळ्या वेळी ही यात्रा लोकमान्य नगर, इंदिरा नगर, कामगार नाका या परिसरात जाणार आहे. या यात्रेत पी एम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन आदी योजनांची माहिती दिली जाईल. तसेच, या योजनेसाठी नोंदणीही करून घेतली जाईल, त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन
महापालिकेने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक
13 डिसेंबर – स. 9.30 ते दु. 1.30 – इंदिरा नगर
दु. 2.30 ते सायं. 5.30 –राम नगर चौक
14 डिसेंबर – स. 9.30 ते दु. 1.30 – साठे नगर चौक
दु. 2.30 ते सायं. 5.30 –कामगार नाका