केंद्र सरकारच्या योजनांनी माहिती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन
आधार कार्डाचे अपग्रेडेशनही करता येणार
नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, महापालिकेचे आवाहन
ठाणे 07 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्पा शुक्रवार, ०८ डिसेंबर ते गुरूवार, १४ डिसेंबर या काळात ठाणे शहरातील ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा आणि लोकमान्य नगर या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना या यात्रेला भेट देऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती घ्यावी, नोंदणी करावी तसेच, आरोग्य शिबिराचाही लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पी एम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, ई- बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती स्टॉलवर देण्यात येते. तसेच, नोंदणीही करण्यात येते.
त्याचबरोबर, आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी व औषधोपचार शिबीर असे विविध उपक्रमही या कार्यक्रमस्थळी होतात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभागसमितीतील एकूण ७४ ठिकाणी जाणार आहे. पहिल्या टप्प्प्यात कोपरी आणि वागळे इस्टेटचा भाग झाला. आता नौपाडा आणि लोकमान्य नगर येथे ही यात्रा येणार आहे.
विविध योजनांसाठी गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक
08 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – सिडको बसस्टॉप, ठाणे प.
दु. 2.30 ते सायं. 5.30 –चिंतामणी चौक, ठाणे प.
09 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – ठाणे रेल्वे स्टेशन, ठाणे प.
दु. 2.30 ते सायं. 5.30 –न्यू प्रभात नगर, गावदेवी, ठाणे प.
10 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – घंटाळी नाका, ठाणे प.
दु. 2.30 ते सायं. 5.30 –टायटन शोरूमसमोर, नौपाडा
11 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – मल्हार सिनेमासमोर, नौपाडा
दु. 2.30 ते सायं. 5.30 –हरिनिवास सर्कल
12 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – कोरस टॉवर, लोकनान्य नगर
दु. 2.30 ते सायं. 5.30 –लोकमान्य नगर बस स्टॉप
13 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – इंदिरा नगर
दु. 2.30 ते सायं. 5.30 –राम नगर चौक
14 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – साठे नगर चौक
दु. 2.30 ते सायं. 5.30 –कामगार नाका