Monday, October 26 2020 3:55 pm

वालदेवी धरणात तीन जणांचा बुडून मृत्यू

नाशिक : धरणात पोहायला उतरताना पाण्याचा अंदाज न आल्याने व एकमेकांना वाचवताना बुडून तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे तिघेही युवक सिडकोतील असून चार जण सोबत गेले होते. त्यातील एक पाण्यात न उतरल्याने तो बचावला आहे . मयत मंगेश बाळासाहेब बागुल ( वय 32 ) रा.पाथर्डी फाटा , महेश रमेश लाळगे ( वय 32 ) रा.महाकाली चौक , वैभव नाना पवार ( 27 ) रा.उत्तम नगर यांच्यासह गणेश एकनाथ जाधव हे चौघे मित्र वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेले होते.मंगेश, महेश व वैभव हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले . पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. हे पाहुन पाण्यात न उतरलेल्या गणेश याने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर पोहचलेल्या नागरिकांनी तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले मात्र तत्पूर्वीच तिघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

घटनेनंतर वाडीव-हे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली . त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृत्यूतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले . या घटनेमुळे सिडको परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.