Tuesday, June 2 2020 4:19 am

वार्षिक स्नेहसंमेलनात आनंद विश्व गुरुकुलतर्फे श्रीगौरी सावंत यांना मारुती इको कार भेट

ठाणे : ‘मी शपथ घेताना धर्मवीर आनंद दिघेंचे नाव घेतले. या संदर्भात काही जण सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. जावा खुशाल जावा! जर पुन्हा शपथ घ्यायला लावली तर तशीच घेईन, तमा बाळगणार नाही. जनता माझ्या पाठीशी आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे. समाजातील सर्व घटकांना सन्मान मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या आज पार पडलेल्या  वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थितांसमोर जाहीरपणे एकनाथ शिंदे यांनी आपले परखड मत मांडले.
वार्षिक स्नेहसंमेलन सर्वच शाळांत होतात, परंतु आनंद विश्व गुरुकुलचे हरसालप्रमाणे यंदाही आगळे वेगळे आणि समाजोपयोगी संमेलन आज ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडले.  या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून चारचौघी या एनजीओच्या डायरेक्टर श्रीगौरी सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्रीगौरी सावंत यांनी उभारलेले आजीचे घर हे तृतीयपंथी वृद्ध लोकांच्या व वेश्या व्यवसायातील मजबूर स्त्रियांच्या निराश्रित मुलांना आधार देणारे, त्यांची काळजी घेणारे घरटे आहे. त्यांनी अशाच ३ मुलींना दत्तक घेतले आहे व त्यांची आई बनून पालन पोषण करत आहेत. त्यांच्या या कार्याला महाविद्यालयाचा हातभार लागावा म्हणून त्यांना नुसते आमंत्रितच नाहीतर तर महाविद्यालयातर्फे मारुती इको कार नामदार एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी भारावून गेलेल्या श्रीगौरी सावंत यांनी भाषणात आपल्या व्यथा मांडल्या. आम्हाला समाजात स्थान मिळावे. सन्मान मिळावा. नोकºया मिळाव्यात. रस्त्यावर कुठलेही मुल भीक मागता कामा नये. वेश्या व्यवसाय करणाºयांची मुलं ही मिरचीच्या फुलाप्रमाणे असतात, मिरचीची फुल तिखट नसतात पांढरी शुभ्र असतात. शेवटी मुलं ही देवाची फुले असतात. त्यांना आधार देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या स्नेहसंमेलनाला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, गोदरेज इंडस्ट्रीजचे संचालक नितीन नाबर, उल्हासनगर आयुक्त सुधाकर देशमुख, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, अभिनेते, दिग्दर्शक विजू माने, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे मुंबई विभाग प्रमुख डॉ. संजय भागवत, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर मराठे, प्रा. चितळे, महाविद्यालयाचे अध्यक्ष विलास ठुसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त अक्षर पारसनीस, डॉ. नमिता धवळ, ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डिकर, मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर आदी मान्यवर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.