ठाणे, १६ – उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून हेतुपुरस्सरपणे हिंदू धर्माबरोबरच जैन धर्माचा अपमान केला जात आहे. त्याचबरोबर साधू-संत, देवी-देवतांविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून विष ओकण्याचे काम केले जात आहे.आता संत ज्ञानेश्वरांविरोधातील वक्तव्याने समस्त वारकरी संप्रदायासह लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी वारकरी संप्रदायाकडून तीव्र धिक्कार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वारकरी संप्रदाय व हिंदुत्ववादी संघटनांकडून ठाणे शहर बंदचे उद्या शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. या बंद आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दिला आहे.