Sunday, September 15 2019 3:26 pm

वाद चव्हाट्यावर , गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांचा राजीनामा !

कोल्हापूर-: गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना बदलण्यासाठी १४ डिसेंबरचा मुहूर्त काढला होता अखेर त्यास पूर्णविराम लागले. १७ पैकी १३ संचालकांनी बंड केल्याने नेते महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी अध्यक्ष बदलाबाबतचा खल करण्यासाठी शुक्रवारी (ता. १४) बैठक बोलाविली होती.
कोल्हापूरमधील ताराबाई पार्क मध्ये गोकुळ संघाच्या नेत्यांनी संचालकांची बैठक घेतली.महाडिक व पाटील सकाळी साडेदहाला गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आले. संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील आणि संचालक उपस्थित होते. त्यात अध्यक्ष पाटील यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. अवघ्या १५ मिनिटांत निर्णय देऊन दोन्ही नेते निघून गेले. दरम्यान, गोकुळ अध्यक्ष बदलण्यासाठी वर्षभर हालचाली सुरू होत्या. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना साडेतीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी मिळाल्याने त्यांना बदलण्याची मागणी होत होती. यासाठी संचालकांनी संघाच्या नेत्यांना साकडेच घातले होते. मात्र या मागणीचा विचार न झाल्याने, संचालकांनी संघाच्या कामकाजात सहभाग न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे संघात अध्यक्ष बदलासाठी हालचाल सुरू होती. महाडिक व पाटील यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी, विद्यमान अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले.