Sunday, November 18 2018 10:46 pm

वसंतविहार परिसरातील हुक्कापार्लरवर गुन्हे शाखेचा छापा-एक अल्पवयीन मुलास घेतले ताब्यात

ठाणे : ठाण्यातील वसंतविहार भागात चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई करीत तेथे हुक्का सेवन करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंतविहार येथील आशर तिहारा कॉम्प्लेक्स मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती गुन्हे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री या हुक्का पार्लरवर छापा टाकला. यावेळी एक अल्पवयीन युवक तेथे हुक्का सेवन करतांना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तसेच हे हुक्का पार्लर चालवणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रोहित गुप्ता (31) आणि अंकुश गुप्ता (25) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.