Monday, June 1 2020 12:59 pm

वरळी मतदारसंघातून आदित्यच्या विरोधात १२ उमेदवार

मुंबई :- ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आदित्य हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदारसंघातून १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मत वाढण्यासाठी अधिक काटकसर करावी लागणार आहे. राज्यातील बंडखोरी थांबविण्यासाठी महायुतीला अपयश आले आहे. राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना इच्छुकांनी बंडखोरी केल्याने महायुतीला जोरदार फटका बसला आहे. त्यात ठाकरे कुटुंबाती पहिलाच उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत असल्याने १२ उमेदवार विरोधात विजय मिळवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला दोरदार प्रयत्न करावे लागणार आहे.