Monday, June 17 2019 4:05 am

वडिलांना टाटा करणे पडले महागात ; तिसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक :नाशिकच्या ‘शिरीन हाईट्स’मधून तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून वडिलांना टाटा करतांना साडेतीन वर्षांचा अंशुमन शर्मा ह्या चिमुरड्याचा खाली पडून मृत्यू झाला.

अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले असता साडेतीन वर्षांचा अंशुमन आपल्या वडिलांना निरोप देण्यासाठी गॅलरीत आला. टाटा करुन तो गॅलरीतच खेळत बसला. दुसरीकडे त्याची आई टीव्ही बघण्यात दंग होती. तेवढय़ात गॅलरीत खेळता खेळता अचानक अंशुमनचा तोल गेला आणि तो तिसऱया मजल्यावरून खालीगेटवर पडला. डोक्याला लागल्यामुळे अंशुमनचा मृत्यू झाला. शर्मा कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी अंबडच्या शिरीन हाईट्समधील नव्या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. मात्र त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीला बसवण्यात आलेला लोखंडी कठडा कमी उंचीचा होता आणि हेच अंशुमनच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. घराच्या बाल्कनीतून पडून चिमुरडय़ाचा मृत्यू होण्याची नाशिकमधील ही तिसरी घटना आहे.