मुंबई, २० :तालुका स्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी २४१ प्रकरणे तडजोडीद्रारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत सबंधित ग्राहकांना ५३ लाख ५५ हजार ७८१ रुपयांचा भरणा केला.
भांडूप परिमंडलातील ठाणे व पेण मंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे सामजस्याने सोडविण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार २४१ प्रकरणामध्ये तडजोड होऊ शकली व ५३ लाख ५५ हजार ७८१ रुपयांची वसुली झाली. भांडूप परिमंडला अंतर्गत ठाणे मंडलातील ठाणे विभाग-१, ठाणे विभाग-२, वागले इस्टेट विभाग, भांडूप विभाग व मुलुंड विभागात १२८ ग्राहकांनी २८ लाख २४ हजार ७८१ रुपयांचा भरणा करून प्रकरणांचा निपटारा केला. तर वाशी मंडळातील वाशी विभाग, नेरूळ विभाग व पनवेल शहर विभागातील ४९ ग्राहकांनी १३ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला. पेण मंडलात ६४ ग्राहकांनी १२ लाख ८० हजार रुपयांचा भरणा करण्यात आले.
लोकअदालत ग्राहकांच्या वीज बिलाबाबत काही तक्रारी असल्यास सोडविण्यासाठी घेतली जाते. सदर लोकअदालत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता श्री.सुनील काकडे, अधीक्षक अभियंता, श्री.अरविंद बुलबुले, व श्री.इब्राहीम मुलाणी तसेच कार्यकारी अभियंते सर्वश्री.सुनील माने, देवेंद्र उंबरकर, सुरेश सवाईराम, दतात्रय भणगे, जीवन चव्हाण, नितीन थिटे, अनिलकुमार पाटील, गणेश पाचपोहे व शिवाजी वायफळकर यांनी विशेष मेहनत घेतली.