आनंदजी परांजपे व नजीबभाई यांनी आयोजिलेल्या होममिनिस्टरमुळे महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण. ना. आदितीताई तटकरे व सौ सुनेत्रावहिनी पवार यांनी दिल्या शुभेच्छा !
होममिनिस्टर विजेत्या पूनम पाटील यांनी प्रथम, संध्या दळवी यांनी द्वितीय तर पूजा भोसले यांनी तृतीय बक्षीस पटकाविले !
ठाणे, 15 आनंदजी परांजपे व नजीबभाई यांनी होममिनिस्टर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करुन महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले, महिलांनी होममिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद याची साक्ष आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील व अजितदादांच्या मागे उभे रहा, असे उद्गार महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी आणि सौ सुनेत्रावहिनी पवार यांनी काढले व होममिनिस्टरच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने शनिवारी, १३ जानेवारी रोजी कळव्यातील खारलॅण्ड मैदानात “होम मिनिस्टर – सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा (वहिनी) पवार आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे या उपस्थित होत्या. यावेळी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपागर, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, रिटा यादव, वहिदा खान, अंकिता शिंदे, अनिता किणे, उमेश पाटील तसेच जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजनाथ यादव, तकी चेऊलकर, पल्लवी गिद, शिवसेनेच्या लता पाटील, शाम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. आदितीताई तटकरे बोलत होत्या.
महिलांना घरच्या कामातुन विश्रांती देत मनोरंजन करण्याचे आणि महिलांच्या आयुष्यात दोन क्षण आनंदाचे आणण्याचे महत्वपूर्ण काम होममिनिस्टर कार्यक्रम करत असतो यामुळे महिलाना होममिनिस्टर कार्यक्रम खुप आवडतो आज या महिलांचे अहो असते तर त्यांनाही महिलांचा हा उत्साह, आनंद पाहून समाधान वाटले असते
नजीबभाई आणि आनंदजी परांजपे यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला. महिलांनी होममिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद ही याची साक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देते. मकरसंक्रांत आणि नवीन वर्ष हे सर्वांनाच सुखदायी जावो. असे सांगून जसजशा निवडणूका जवळ येतील तसतसे विरोधाकडून महायुतीविरोधात वक्तव्य होतच राहतील पण ज्या महायुतीच्या उमेदवारांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील त्यांना सर्व जनता, मतदार विजयाचा कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने निवडून देतील, असे मत ना. आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केले.
तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा (वहिनी) पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले की, आनंद व नजीब यांनी होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित करुन मनोरंजनाच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्यात विरंगुळा निर्माण केला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने व जिजाऊ जयंतीच्या निमिताने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि अजितदादांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा असे आवाहन करते.
होममिनिस्टरच्या या कार्यक्रमात पहिले बक्षीस : मानाची पैठणी व सोन्याची नथ खारीगावच्या पूनम पाटील यांनी पटकाविले, दुसरे बक्षीस : मानाची पैठणी व मोत्याचा तनमणी खारीगाव च्या संध्या दळवी यांनी पटकाविले तर तिसरे बक्षीस : मानाची पैठणी व चांदीचे पैंजण मुंब्रा येथील पूजा भोसले यांनी पटकाविले. यावेळी उत्तेजनार्थ ७ बक्षिसे : सेमी पैठणी आणि आकर्षक भेटवस्तू दिली गेली तर ५० लकी ड्रॉ ची बक्षीसेही दिली गेली. तसेच या खेळात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला सहभागाबद्दल आकर्षक भेटवस्तू दिली गेली. बक्षिसांचा जणू वर्षावच करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यशस्वी व दिलखुलास सूत्रसंचालन स्वप्नील जाधव यांनी केले. सुईत दोरा अडकविणे, कपाचा पिरॅमिड्स, दोऱ्यात मणी ओवणे, तळ्यात- मळ्यात, फुगा फुगवून बसून फोडणे, स्ट्राॅ केसात रोवणे, रिंगातुन उडी मारणे, चमच्यातुन सोयाबीन टाकणे, चेंडू बादलीत टाकणे, चेंडू रिंगात खेळणे, रस्सीमध्ये रंगानुसार रुमाल बांधणे आदीं खेळाद्वारे मनोरंजन करत, गाण्यांच्या तालावर, शेकडो महिलांना खेळात सहभागी करुन घेण्याची किमया स्वप्नील जाधव यांनी साधली.