Friday, May 24 2019 9:40 am

लोकसभा निवडणुका नउऐवजी सात टप्प्यात आजपासून आचारसंहिता लागू ,२३ मे ला निकाल

नवी दिल्ली : दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला. लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसारच होणार, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा निवडणुकांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न निवडणूक आयोगाला पत्रकारांनी विचारला होता. त्यावर ‘देशातील लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील’ असं उत्तर अरोरा यांनी दिलं.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.

१)फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे.
२) मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार आहे.
३) निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार आहे.
४) रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही
५) लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, देशभरात आचारसंहिता लागू, आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
६) ईव्हीएमवर मतदाराचा फोटो असणार, सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन, दहा लाख पोलिंग बूथ

७) 1950 या टोल फ्री क्रमांकावर मतदानाशी निगडीत सर्व माहिती मतदारांना मिळणार, अॅपवरही तक्रारीची सुविधा उपलब्ध आहे.

८) देशातील मतदार 90 कोटीच्या घरात, 2014 च्या तुलनेत सात कोटींनी वाढ, 18-19 वर्षे वयोगटातील दीड कोटी, तर 1.60 कोटी नोकरदार मतदार

९) सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा, धार्मिक सण-उत्सव यांचा विचार करुन लोकसभा निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक

निवडणुकांच्या तयारीला लवकर सुरुवात करण्यात येत आहे.रविवार असल्यामुळे सर्वांचे लक्ष आज निवडणुका कधी जाहीर होतील याकडे होते.