Tuesday, December 1 2020 1:34 am

लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरवात; कोणाला मिळणार पूर्ण बहुमत.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदा व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांमध्ये मतदानयंत्रे आणि मतपावत्या याआधारे मतपडताळणी केली जाणार आहे.

  1. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. देशभरात ५४२ लोकसभा मतदारसंघांमधील १०.३ लाख मतदानकेंद्रांवर मतदान झाले असून मतपावती जोडलेल्या १६,२६० मतदान यंत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या मतपडताळणी प्रक्रियेसाठी पाच ते सहा तासांचा कालावधी जास्त लागणार असल्याने अधिकृत निकालांना काही काळ अजून वाट पाहावी लागेल असे दिसून येते आहे