Monday, January 27 2020 2:12 pm

लोकल मधून पडून तरुणाचा मृत्यू

विरार :- चालत्या लोकल मधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी  विरार-वैतरणा स्थानकांदरम्यान घडली. पालघर जिल्ह्यातील  माकुणसार येथील   स्वप्नील हरेश्वर किणी याचा दुर्दैवी  मृत्यू  झाला.  सोमवारी  डहाणू लोकलमधून प्रवास करत असताना  सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास  विरार-वैतरणा स्थानकांदरम्यान  स्वप्नील चा अपघात झाला. अपघात झाल्याचे समजताच स्वप्नीलला रुग्णालयात पोहोचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्या दिवशी स्ट्रेचर घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

  प्नील विरार-वैतरणा दरम्यानच्या प्रवासात लोकल मधून पडले. त्यांच्या सोबत असलेल्या सहप्रवाशांनी तात्काळ साखळी खेचून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकल थांबली नाही. शेवटी काही तरुणांनी वैतरणा स्थानकात उतरून वैतरणा स्टेशन मास्तरना अपघाताची माहिती दिली आणि विरारकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या मोटरमनच्या साह्याने जखमी स्वप्नीलचा शोध घेतला. त्याला जखमी अवस्थेत विरार स्थानकात सहप्रवाशांच्या मदतीने आणले.