Tuesday, July 7 2020 2:20 am

लोकलच्या पेंटाग्राफला आग;हार्बर लाईन विस्कळीत

नवी मुंबई :- लोकलच्या पेंटा ग्राफला अचानक आग लागल्याची घटना हार्बर लाईन वरील वाशी स्थानकावर घडली. यामुळे हार्बर लाईन वरील वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. वाशी रेल्वे स्थानकावरील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील लोकल च्या पेंटा ग्राफ मध्ये बिघाड झाल्याने अचानक आग लागली. ऐन कामावर जाण्याच्या वेळेत हि आग लागल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱयांनी अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणून लोकल कारशेड ला रवाना केली.