Wednesday, January 20 2021 12:56 am

लॉकडाऊनमध्ये पैशाच्या कमरतेमुळे मध्यप्रदेशमधील तरुण गावठी कट्टा विकण्यासाठी डोंबिवलीत , रामनगर पोलिसांची कारवाई

डोंबिवली : मध्यप्रदेश मधील इंदौर मधून गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला असून नरेंद्र रामप्रसाद कौशल असे या आरोपीचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये पैशाच्या कमरतेमुळे मध्यप्रदेशमधील तरुण गावठी कट्टा विकण्यासाठी डोंबिवलीत आला होता.उल्हासनगर ५ मधील बंटी नावाच्या व्यक्तीला हा कट्टा विकण्यासाठी आपण आल्याची माहिती रामप्रसाद याने पोलिसांना दिली.

ठाणे पोलीस आयुक्त परिसरात विनापरवाना लाठ्या काठ्या किंवा कोणतेही शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आलेली असताना हा मनाई आदेश झुगारून रामप्रसाद रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळ गावठी कट्टा विकण्यासाठी आल्याची माहिती पोलीस नाईक चंद्रकात शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता रामप्रसाद स्टेशन जवळ ग्राहकाची वाट पाहत थांबल्याचे आढळून आले त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्याने लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळेच हा कट्टा विकण्यासाठी इथपर्यत आल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान ग्राहक बंटी याचा पोलीस शोध घेत असून जमिनीच्या वाद असल्याने त्याला हा गावठी कट्टा हवा असल्याचा पोलिसांना संशय आहे.