Thursday, June 20 2019 3:14 pm

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल उद्या लागणार

औरंगाबाद :राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.त्यामुळे लातूरउस्मानाबादबीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्याऔरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्यातसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईलअशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहेयाशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिलेत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्याधनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहेमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने स्थगित केलेली लातूर बीडउस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया 11 जूनपर्यंत पूर्ण कराअशा सूचना मुख्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.