Saturday, April 20 2019 12:00 am

लाच देऊ नका, घेऊ नका दक्षता जनजागृती सप्ताह सुरू

ठाणे : राज्यात यावर्षी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात यासंदर्भातील जनजागृती करायची ठरविली आहे आधी माहिती पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग डॉ महेश पाटील यांनी दिली.यामध्ये सोमवारी 29 तारखेस सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन सप्ताहास सुरुवात होणार आहे.

सप्ताहाबाबत माहिती होण्यासाठी कार्यालयात फलक लावणे. शाळा, महाविद्यालयात भ्रष्टाचाराच्या परिणामांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम याजोडीने चित्रपट गृहे, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल. याशिवाय महत्वाचा भाग म्हणजे प्रमुख कार्यालयांत बैठका घेऊन लाचखोरीसंदर्भात, तसेच विभाग करीत असलेल्या कार्यवाहीची, कायद्यातील तरतुदींची व्यापक माहिती देण्यात येणार आहे

या उपक्रमात अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच लाचेसंदर्भातील तक्रारींसाठी 1064 या क्रमांकावर माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे. spacbthane@mahapolice.gov.in असा ठाणे कार्यालयाचा ईमेल असून या कार्यालयाच्या परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून याठिकणीही विविध कार्यक्रम साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सप्ताहाच्या आयोजनाची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकावर सोपवण्यात आली आहे.