Wednesday, October 23 2019 5:51 am

लवकरच उल्हासनगर मधे मेट्रो ; मुख्यमंत्र्यांची घोषणा 

ठाणे : कल्याण मेट्रोचा विस्तार है उल्हासनगर पर्यंत करण्यात येईल आणि तय स्थानकाचे नाव सिंधुनगर असेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुख्यमंत्री सध्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठीक ठिकाणी सभा घेत आहेत महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उल्हासनगर येथे आले होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरकरांना मेट्रोचे आश्वासन दिल आहे. उल्हासनगर येथे सिंधी बांधव मोठ्या प्रमाणात राहत त्यामुळे येथील  उल्हासनगर स्थानकाचे नाव सिंधुनगर करावे अशी येथील स्थानिकांनी मागणी केली होती त्यामुळे हाच मुद्दा घेऊन उल्हासनगर मेट्रो स्थानकाचे नाव सिंधुनगर ठेवण्याची घोषणा करून अनेक सिंधी नागरिकांची मने मुख्यमंत्र्यांनी जिंकली आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधीच आम्ही उल्हासनगर पर्यंत मेट्रोचा निर्णय घेतला आहे. आणि त्या स्थानकाचे नाव सिंधुनगर करण्याचा ही निर्णय आम्ही घेतला आहे एकदा का उल्हासनगर मधे मेट्रो चालू झाली की अवघ्या तासात मुंबई गाठता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले