Thursday, August 22 2019 4:33 am

लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार

नवी मुंबई -: स्वप्नांच्या मागे धावण्यात आपण इतके व्यस्त असतो कि आपण आपली आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींची खरी ओळख पडताळून पाहण्यास विसरत चाललो आहे. घणसोलीत राहणाऱ्या एका तरुणाने आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीसोबत मैत्री करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युसूफअली खान असे या तरुणाचे नाव असून कोपरखैरणे पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.तक्रारदार तरुणी मूळची मध्य प्रदेशातील आहे. ती घणसोलीतील एका नामवंत आयटी कंपनीत कामाला आहे. सेक्‍टर-४ मध्ये भाड्याच्या खोलीत ती राहते. त्या वेळी तिची युसूफअली खान याच्याबरोबर ओळख झाली.
दरम्यान, ऑगस्ट २०१७ मध्ये पीडित तरुणीला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने घणसोली सेक्‍टर-२ येथील घरी नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने लग्नाच्या भूलथापा देऊन वारंवार शरीरसंबंध ठेवले.