Monday, April 6 2020 1:33 pm

रेशनवर निकृष्ठ गहूमुळे रेशन दुकानदाराला मारहाण

ठाणे :  रेशनवरील निकृष्ठ गहूवरून जाब विचारला म्हणून पत्नीशी वाद घालणाऱ्या रेशनदुकानदाराला पती व मुलाने रेशन रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची घटना ठाण्यातील किसननगर भागात घडली.याप्रकरणी,श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बाप-बेट्याला ताब्यात घेतले आहे.
वागळे इस्टेट,शांतीनगर भागात राहणारे प्रमोद जैस्वाल यांचे किसननगर नं.2 येथे रास्त दराचे शिधावाटप दुकान आहे.त्यांच्या दुकानात त्याचपरिसरात राहणाऱ्या मंजुकुमारी गुप्ता ह्या रेशनवरील धान्य घेण्यासाठी आल्या असत्या रेशनवरील गहू निकृष्ठ असल्याची तक्रार केली.त्यावर रेशनदुकानदार जैस्वाल यांनी,सरकारकडून येणारे गहू आम्ही देतो.असे सांगून गुप्ता यांची समजूत काढली होती.याच गुप्ता कुटुंबियांचे रेशन कार्ड पूर्वी गहाळ झाले होते.त्याला रेशन दुकानदार जैस्वाल हेच कारणीभूत असल्याचा समाज गुप्ता कुटुंबीयांचा झाला होता.या रागातून 24 फेब्रु.रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंजुकुमारीचे पती रामजीत गुप्ता आणि मुलगा शिवम गुप्ता या दोघांनी रेशन दुकानासमोर जैस्वाल याना मारहाण केली.शिवम याने लोखंडी डबा डोक्यात मारल्याने जैस्वाल रक्तबंबाळ झाले.इजा झाल्याने त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले.अशी माहिती पोलिसांनी दिली.