Tuesday, November 19 2019 3:29 am
ताजी बातमी

रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे उशिराने सुरु

मुंबई :- चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. आज  सकाळी साडे आठच्या सुमारास चेंबूर ते टिळकनगर स्टेशन दरम्यान हा तडा गेला आहे. रुळाला तडा गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच  रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम हाती घेत ते पूर्ण केले.
 हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने या रेल्वे रूळाचे काम हाती घेऊन दुरूस्त केले. सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास १५ मिनिटे उशिराने सुरू होती. ऐन गर्दीच्यावेळी हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची स्टेशनवर गर्दी वाढली होती.