Monday, October 26 2020 3:14 pm

रेल्वे प्रवाशीसाठी मोठा निर्णय रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करु शकणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने जनतेला आणखी एक दिलासा दिला आहे. रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकी प्रवाशांसाठी अखेर खुली करण्यात येत आहे. 22 मे पासून म्हणजेच उद्यापासून प्रवाशी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करु शकणार आहेत. त्याशिवाय, 1 जूननंतर चालवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटं रद्द झाल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळणार आहे.

आरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील काउंटरवरुन तिकीट बुक करता येणार आहे. तिकिटांच्या बुकिंग दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी तिथल्या विभागीय रेल्वेवर असेल, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. रेल्वे मंत्री रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली