Monday, June 17 2019 4:08 am

रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करूत – उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्था !

ठाणे-: उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेने सन २००९ पासून प्रवाशांच्या हितसंवर्धनासाठी कामास सुरुवात केली. त्यावेळी बऱ्याच व्यक्ती स्थानिक पातळीवर रेल्वे प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करीत होत्या, त्यातील बरेच कार्येकर्ते आज उपनगरीय रेल्वे प्रवाशी एकता संस्थेम्ध्ये सामील झाले.

उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेने आजपर्यंत एक सामुहिक निषेध मोर्चा व मुंबई येथे पत्रकार परीषद आयोजित केलेली होती. वट्या अनुशंगाने   सद्दस्थितीत सतत रेल्वे अधिकार्यांना संपर्क साधून , चर्चा-बेठक करून प्रवाशांचे प्रश्न तत्काळ सुटावेत यांसाठी पर्यन्त करीत आहेत. परंतु प्रत्येक बाबतीत समाधानकारक यश मिळतच असं नाही.

जुन्या काळात रेल्वेमध्ये अशी पद्धत होती कि, विविध खात्यातील अधिकारी नेहमी रेल्वे स्थानकांना  भेट द्यायचे व त्यामुळे प्रवाशांसोबत स्थानिक प्रश्नावर वार्तालाप करून त्या स्थानकांचे व प्रवाशांचे संबंधीत प्रश्न जागेवरच सोडवत असे. त्याशिवाय प्रत्येक वर्षी विभागीय रेल्वे अधीक्षक, विभागीय अधिकार्यंश संपुर्ण विभागाच्या निरीक्षणासाठी जात असत. मात्र आता हि पद्धत बंद झालेली असावी असे दिसते. त्या गोष्टीचा पर्याय म्हणून  आता रेल्वे प्रवासी संघटना डी आर एम किंवा विभागीय अधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना भेट देखील लवकर मिळत नाही. त्यामुळे  रेल्वे अधिकारी  व प्रवाशांमध्ये काहीच संपर्क राहत नाही.

तरी सदर बाबत कारवाई करणेकमी उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेमार्फत  रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. तरी रेल्वेच्या अधिकार्यांनी किमान नोंदणीकृत प्रवासीसंघटनाना तरी अशा भेटी दिल्या तर बरेच विषय सामंज्यासपणे सुटू शकतात याची आम्हाला खात्री आहे. असे पत्रकार परिषदेत उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेची मागणी मांडली.