ठाणे,११ :बांधकाम क्षेत्रात पहिल्यांदाच उतरलेल्या रेमंड रिअॅलिटीने ‘कोविड’ महामारीच्या काळातील संकटावर मात करून तीन वर्षांत तीन उत्तुंग टॉवर उभारून नवा मापदंड निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, ‘रेमंड’च्या ‘टेनएक्स हॅबिटॅट’ या दहा टॉवरच्या ठाण्यातील प्रकल्पामध्ये ४२ मजल्यांचे तीन टॉवर्स ‘रेरा’च्या टाईमलाईनच्या २४ महिने आधी उभारले असून इमारतींना ठाणे महापालिकेकडून वापर परवानाही मिळवला आहे. शनिवारी येथील सदनिकांच्या चाव्या खरेदीदारांना वाटपाचा कार्यक्रम ‘रेमंड’समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांच्या उपस्थितीत जेके ग्राम येथे पार पडला. असीम निर्धाराने हे काम वेळेपूर्वीच करण्यात यश आल्याचे सिंघानिया यांनी नमूद केले. यावेळी ‘टेनएक्स हॅबिटॅट’ गृहप्रकल्पाचे वास्तूविशारद उ हाफीज कॉन्ट्रॅक्टर आणि ‘रेमंड रिअॅलिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हरमोहन साहनी उपस्थित होते.