Thursday, June 20 2019 3:15 pm

रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे सर्वेसर्वा राजू बलबले यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

ठाणे. ( विशेष प्रतिनिधी ) – रेनबो इंटरनॅशनल स्कूल चे सर्वेसर्वा, ठाणे जिल्ह्याचे तसेच मुंबई मधील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक राजू बलबले यांनी आज सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले बलबले यांना सदर पक्षातील धोरणे मान्य नसल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

ठाण्यातून बलबले यांनी आपली शैक्षणिक संस्था रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम राबविण्यास काही वर्षांपूर्वी सुरवात केली होती आता त्याचा अवाका खूप मोठा झाला असून त्यांच्या संस्थेच्या ठाण्यात विविध ठिकाणी तसेच इतर ठिकाणी देखील शाळा कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा त्यांचा मानस असून मागील काही वर्षांपासून ते अत्यंत कसोटीने त्यासाठी कार्यरत आहेत. यापुढेही ते शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारची सेवा देण्यात सदैव कटिबद्ध राहणार आहेत, त्याचबरोबर ते शिवसेना पक्षात देखील अविरतपणे आपले कार्य राहतील असे त्यांनी सांगितले आहे.