Tuesday, July 7 2020 12:52 am

रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलखाली येऊन मृत्यू

डोंबिवली -: कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलखाली येऊन मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, कोपर स्थानकात मंगळवारपासून (5 फेब्रुवारी) भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर, आरपीएफ आणि प्रवासी संघटनांचे ‘रेल्वे रूळ ओलांडू नका’ यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी सकाळी हे अभियान सुरू असतानाच एका प्रवाशाचा अपघातीमृत्यू झाला.
पदर अडकल्याने रेल्वेखाली चिरडून मायलेकासह तिघे ठार दरम्यान, प्रीती तिचा मुलगा लिवेशला घेऊन सासरे भास्कर राणे यांच्यासोबत दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोपर येथील भंगाळे यांच्या घरी जात होती. त्यांच्या नातलग सुनीता भंगाळे यादेखील सोबत होत्या. त्या वेळी कोपर रेल्वेरूळ ओलांडताना एका रुळावरून जनशताब्दी एक्स्प्रेस तर दुसऱ्या रुळावरून जलद लोकल आली. दोन्हीकडून अचानक रेल्वे आल्याने सुनीता व प्रीती या दोन्ही रुळांच्या मध्ये थांबल्या. त्या वेळी रेल्वेमध्ये सुनीता यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्यांच्यासोबत प्रीती आणि लिवेश हे दोघेही रेल्वेखाली आले.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील कोपर स्थानक परिसरात रूळ ओलांडताना रविवारी बालकासह तिघांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पाच मिनिटे उशीर झाला तरी चालेल; पण नाहक जीव धोक्यात घालू नका. पादचारी पुलाचा वापर करा, असे आवाहन करत मंगळवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनीही प्रवाशांची संवाद साधला.