मुंबई 8- रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख,तरुण तडफदार कार्यकर्ते धर्मानंद गायकवाड यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. हा आपघात संशयास्पद वाटत असल्यामुळे धर्मानंद गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अत्यंत तडफदार कार्यकर्ते असणारे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्या अपघाती निधनाने रिपब्लिकन चळवळीमध्ये शोककळा पसरली आहे.संपूर्ण रायगड जिल्हात रिपब्लिकन चळवळीत दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत धर्मानंद गायकवाड हे त्यांच्या गाडीने पहाटे घरी परतत असताना कर्जत किनवली ब्रिजवर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी रेलिंग तोडुन त्यांची गाडी ब्रिजखालून जाणाऱ्या रेल्वे रुळावरील माल गाडीला धडकली. त्यात दोघे जण जागीच गतप्राण झाले. त्यांची गाडी क्रेन ने उचलल्या नंतर दिवंगत धर्मानंद गायकवाड यांचा मृतदेह बचावकार्य करणाऱ्या लोकांना सापडला. धर्मनांद गायकवाड यांच्या निधनाने कर्जत पनवेल नेरळ भागात रिपब्लिकन पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली. या अपघात प्रकरणी मध्य रेल्वे चे विभागीय व्यस्थापक जैन यांच्या शी ना.रामदास आठवले यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. रेल्वे रुळांवर जे पूल आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. रुळांवरील वाहतूक ब्रिज भोवती मजबूत संरक्षण भिंतीचे कठडे आणि मजबूत लोखंडी रेलिंग आवश्यक आहे. अपघातस्थळी ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.
दिवंगत धर्मानंद गायकवाड हे चांगले सुस्वभावी,अभ्यासू कार्यकर्ते होते.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.अशा शब्दांत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत धर्मानंद गायकवाड यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. धर्मानंद गायकवाड हे तरुण कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे. येत्या दि.19 नोव्हेंम्बर रोजी नेरळ येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत धर्मानंद गायकवाड यांची जाहीर श्रद्धांजली आयोजित करण्यात आल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
आज दि.7 नोव्हेंबर रोजी दु.3 वाजता नेरळ पूर्व येथील गणेशघाटा जवळच्या स्मशानभुमित दिवंगत धर्मानंद गायकवाड यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी दिवंगत धर्मानंद गायकवाड यांच्या अंत्ययात्रेत ना.रामदास आठवले सहभागी झाले,तसेच स्मशानभुमीमध्ये उपस्थितीत राहुन ना.रामदास आठवले यांनी धर्मानंद गायकवाड यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या अंत्यविधी मध्ये उपस्थितीत राहुन धर्मानंद गायकवाड यांना विनम्र श्रध्दंजली अपर्ण केली.यावेळी रायगड आणि मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.यावेळी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे हे सुध्दा धर्मानंद गायकवाड यांच्या अंत्यविधित उपस्थितीत होते. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड ; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; मोहन गायकवाड; अमित तांबे; सुमित मोरे; अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.