Thursday, August 22 2019 4:15 am

राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, आठवलेंनी त्यांच्या कवितेतून मोदींचं तोंडभरुन कौतुक

नवी दिल्ली-: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी  काँग्रेसवर घणाघाती टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेनी  त्यांच्या भाषणादरम्यान कविता सादर केली. यामुळे संसदेत एकच हशा पसरला. राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, असं आठवलेंनी त्यांच्या कवितेतून मोदींचं तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांवर तोंडसुख घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भाषणानंतर आठवलेंनी भाषण केलं. त्यांच्या कवितांमुळे संसदेत हास्याची कारंजी उडाली. विशेष म्हणजे आठवलेंची कविता ऐकून मोदींनाही हसू आवरलं नाही.आठवलेंची ही धमाल कविता सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली आहे.