ठाणे, ०१ – राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणा-या माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखडा (Mission Life) राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहचावी व पर्यावरण संवर्धनीय उपक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दिला.
ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाद्वारे माझी वसुंधरा अभियान 3.0 व राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखडा (Mission Life) अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त, पर्यावरण विभाग अनघा कदम यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे, बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रा. ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आदी महाविद्यालये सहभागी झाली होती.
या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अत्यंत अभिनव व कल्पकतेने घोषवाक्ये तयार करुन सार्वजनिक पर्यावरणाबाबत जागरुक असल्याचे दाखवून दिले. या घोषवाक्यांद्वारे मुख्यतः वृक्ष लागवड, सायकलचा अधिकतम वापर, वसुंधरेचे संवर्धन, पंचतत्वांचे संवर्धन व जल संवर्धनाबाबतचे अभिनव संदेश विद्यार्थ्यांनी दिले आहेत.
या स्पर्धेत महाविद्यालयीन स्तरावर बाजी मारलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे, *सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय* – प्रथम क्र. सायली शैलेश लाड, द्वितीय क्र. श्रेया अजय सिंग, तृतीय क्र. रुपांशी श्यामजित विश्वकर्मा, *बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय* – प्रथम क्र. राज धूमाळे, द्वितीय क्र. अमोल चौगूले, तृतीय क्र. प्रथमेश मलिक, *ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी* – प्रथम क्र. वैभव रामदास धुमाळ, द्वितीय क्र. सुयोग बाबुराव डोंगरे, तृतीय क्र. हर्षल बाळकृष्ण आपोणकर, *रा. ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय* – प्रथम क्र. आशू अनिल रायबोले, द्वितीय क्र. गितेश भूषण चावटे, तृतीय क्र. दक्षा देविदास खळे, *ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय* – प्रथम क्र. अशोक दिनेश यादव, द्वितीय क्र. तनुश्री पाटणकर, तृतीय क्र. गौरव जोगदंड.