Monday, June 1 2020 2:17 pm

राष्ट्रीय रिदमीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व.

ठाणे : शालेय रिदमीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अवर्णनीय यश
मिळवले. आग्रा यथे झालेल्या 65व्या राष्ट्रीयआग्रा यथे झालेल्या एकूण 27 सुवर्ण, 27 रजत आणि 27 कांस्य पदकांपैकी , 22 सुवर्ण पदके , 5 रजत आणि 5 कांस्य पदके मिळवत या स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.
14 वर्षाखालील गटात संयुक्ता काळे 6 सुवर्ण, किमया कारले 1सुवर्ण 3 रजत, रिया
खिलारे 1 सुवर्ण , 1 रजत , स्वरा भोगले 1 सुवर्ण, 1 रजत ; 17 वर्षांखालील गटात ,
अस्मि बदडे 5 सुवर्ण 1 रजत, श्रेया भंगाळे 2 सुवर्ण , 4 रजत, निष्का काळे 1 सुवर्ण
1 कांस्य , गार्गी पंतवैद्य 1 सुवर्ण ; 19 वर्षाखालील गटात क्रिशा छेडा 1 सुवर्ण, 5
रजत, अनन्या सोमण 1 सुवर्ण, 3 कांस्य , दिव्याक्षी म्हात्रे 1 सुवर्ण 1 कांस्य आणि
सई खोंड 1 सुवर्ण अशी पदके मिळाली आहेत.
महाराष्ट्र संघाला क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे, संघ व्यवस्थापक संतोष आवचार,
सदानंद सवळे, आनंद थोरात, सिध्दार्थ कदम, तनुजा गाढवे, सचिन मांडवकर, संजोग
ढोले, राजेश शिर्के, महेंद्र बाभूळकर, दिनेश जायभाये यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
संयुक्ता, किमया , रिया ,अस्मि , श्रेया , दिव्याक्षी या सर्व मुली आंतरराष्ट्रीय खेळाडु
कोच व पंच कु. पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे
फिनिक्स जिम्नॅस्टिक ऍकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण आर्य क्रीडा
मंडळ , संस्कार पब्लीक स्कुल व श्रीरंग विद्यालय या तीन ठिकाणी दिले जाते.
याबरोबरच फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 14 वर्षांखालील
गटात स्पृहा साहू 1 कांस्य  ,  वैष्णवी मुणगेकर १ कांस्य, धार्मी सत्रा 1 कांस्य तर
17 वर्षाखालील गटात जानवी ठाकूर 1 रजत, सिया कंगुटकर 1 रजत यांनाही पदके
मिळाली आहेत. तसेच दिशिता छेडा आणि सलोनी शौचे यांचाही एकोणीस
वर्षाखालील गटात सहभाग होता

Attachments area