मुंबई,6 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष अरुण हलदर यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
आपल्या मुंबई भेटीत आयोगाने अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्याची माहिती हलदर यांनी राज्यपालांना दिली.
आयोगाच्या सदस्य डॉ अंजू बाला व सुभाष पारधी तसेच आयोगाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.