Wednesday, April 23 2025 12:39 am

राष्ट्रवादी काँग्रेस देणार ऑन दि स्पॉट विविध दाखले

रहिवास, उत्पन्न, अधिवास, ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचे मोफत वाटप

ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे- पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे आणि ठाणे पालघर महिला विभागिय अध्यक्षा ॠताताई आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (दि. 26) रोजी सेंट लॉरेन्स हायस्कूल अँड ज्यनिअर कॉलेज, रोड नंबर 3, फडके मार्ग डिसोझावाडी, वागळे इस्टेट ठाणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरामध्ये रहिवास दाखला, अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखला काढून देण्यात येणार आहे.

दाखले मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, बी 3, गिरीजा एन्क्लेव्ह, श्री तुळजाभवानी मंदिरानजीक गणेशवाडी, पांचपाखाडी; अमित जयसिंग सरैय्या यांचे जनसंपर्क कार्यालय, शॉप नं.6, ओम कमल पुष्प को.ऑप.हौ. सो., लोकमान्य नगर बस देपोजवळ, ठाणे; मयूर शिवाजी शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय, ओम शक्ती अपार्टमेंट, मनपसंद स्वीट्स जवळ, स्वा.सावरकर नगर; रविंद्र सिताराम पालव यांचे जनसंपर्क कार्यालय, शॉप नं.3, एव्हरेस्ट बिल्डिंग, गणेश चौक, भटवाडी, किसन नगर नं.3, वागळे इस्टेट; विक्रम खामकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, लक्ष्मी निवास, तळ मजला, किसन नगर नं.3, वागळे इस्टेट; हेमंत वाणी यांचे जनसंपर्क कार्यालय, हंस नगर, खोपट; समीर पेंढारे यांचे जनसंपर्क कार्यालय, मयूर अपार्टमेंट, खोपट; सिल्व्हेस्टर डिसोझा यांचे जनसंपर्क कार्यालय, शॉप नं.1, केरन हाऊस, डिसोझा वाडी, वागळे इस्टेट; श्रीमती सुजाता विजय घाग यांचे जनसंपर्क कार्यालय, जय मल्हार बिल्डिंग, तळ मजला, शॉप नं.4, पडवळ नगर, वागळे इस्टेट; अजित सावंत यांचे जनसंपर्क कार्यालय, कैलाश स्वीट्स समोर, कोपरी ; मिलिंद बनकर यांचे जनसंपर्क कार्यालय, गांधी नगर, आनंद नगर, कोपरी; उमेश अग्रवाल यांचे जनसंपर्क कार्यालय, वसंत विहार, तुळशी धाम; विजय भामरे केबल कार्यालय, आझाद नगर; रत्नेश दुबे यांचे जनसंपर्क कार्यालय, इंदिरा नगर, रूपा देवी पाडा नं.1, रोड नं.33, वागळे इस्टेट; शिवा कालुसिंह यांचे जनसंपर्क कार्यालय, सी.पी. तलाव, रोड नं.27, शिव गॅरेज च्या मागे, वागळे इस्टेट; दिनेश सोनकांबळे, राम नगर, रोड नं.28, लिंबूनी बुद्ध विहार, वागळे इस्टेट, ठाणे ; संदीप जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय विश्वराज इन्फ्रा, 5 आनंद इन्क्लेव्ह, पाईप लाईन रोड, लुइस वाडी, सचिन पंधारे यांचे जनसंपर्क कार्यालय, जिजामाता नगर,; फिरोज पठाण, हजुरी, जे.के. बेकरी समोर, राजीव गांधी चौक, हाजुरी येथून अर्ज घेऊन जावेत, तसेच अर्जासोबत या दाखल्यांसाठी नागरिकांनी जन्माचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल, करपावती, शिधापत्रिका आदी कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले आहे.