ठाणे 03 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज (दि. 3) सावित्रीमाई फुले यांची तर येत्या मंगळवारी (दि. ९) फातिमा शेख यांची १९३ वी जयंती आहे. या दोन्ही क्रांतीज्योतींची संयुक्त जयंती पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे यांच्या हस्ते सावित्रीमाई आणि फातीमाबी शेख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी, सुरेखाताई पाटील म्हणाल्या की, सावित्रीमाई फुले यांनी शेणगोट्यांचा मारा सहन करून आम्हा सर्व महिलांचे भवितव्य सुरक्षित केले आहे. आज आपण इथे उभे आहोत, त्या मागे सावित्रीमाई यांचा त्याग आणि संघर्ष आहे. या संघर्षाची जाण ठेवून आपण सर्व महिलांनी सावित्रीमाईंच्या कार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली पाहिजे.
विक्रम खामकर यांनी, सावित्रीमाई आणि जोतिराव फुले यांना गोविंदराव फुले यांनी घराबाहेर काढले, त्यावेळेस मियाँ उस्मान शेख यांनीच त्यांना आश्रय दिला. पुढे अहमदनगरमध्ये अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीमाई फुलेंशी झाली. फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला. त्यामुळे सावित्रीमाई आणि फातिमाबी यांचे कार्य हे आपणासाठी आदर्श आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कर्तृत्वास अभिवादन करतो, असे सांगितले.
यावेळी फुलबानो पटेल, ज्योती निंबर्गी, माधुरी सोनार, शुभांगी कोळपकर, वंदना लांडगे, वंदना भाईंगडे, राणी देसाई, मनिषा भाबड, संगीता चंद्रवंशी, संगीता शेळके, रेश्मा भानुशाली, सुजाता गायकवाड, लक्ष्मी पवार, वर्षा साबळे, शितल कुडाळकर, हाजी बेगम शेख, मनिषा पाटील, सुनिता खरात, प्रतिमा पुर्पेकर, कोमल पंडीत, ज्योती चव्हाण, आशा पटेल, रेखा पटेल, राजश्री गुरव, कलावती जैस्वाल, संगीता लोहकरे, संगीता राजदेव, रेणू अलगुडे, निलम साळवी, बबिता पटेल, नेहा कंगणे , सरिता अहिरे, शोभा गायकवाड, आरती खरात, सोमा डे आदी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.