ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्रीावटप कार्यक्रमास ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠताताई आव्हाड या उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस हेमंत वाणी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा वाणी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे 3 हजार नागरिकांना मोफत छत्री देण्यात आली.
दरम्यान, देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांना छत्री घ्यावी की पोट भरावे, असा प्रश्न पडला आहे. याच काळात हेमंत वाणी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना मोफत छत्र्या देऊन एक चांगला उपक्रम राबविला आहे, असे मत यावेळी ॠताताई आव्हाड यांनी केले. या प्रसंगी.