Thursday, July 17 2025 7:05 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन

मुंबई 7 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा मुंबईतील हा पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी श्री सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले आणि श्रींची आरती केली.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह विश्वस्त, न्यास समितीच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत, राष्ट्रपती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मंदिर न्यास समितीतर्फे गणपतीची मूर्ती भेट देऊन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.