Tuesday, December 1 2020 1:23 am

रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये ३९७ तर उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार !

पेण :  पनवेल तालुक्यात मध्ये ७ नवीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये नेरे येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. . महापालिका क्षेत्रात १० नवीन रुग्ण सापडले असून २ रुग्णांनी कोरोंनावर मात केल्याने घरी गेले आहेत. आजच्या रुग्णांमध्ये पनवेल तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि नवीन पनवेल मधील वकिलाचा समावेश आहे. बुधवार १३ मे रोजी कामोठे ५, खारघर ३ नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी मध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या १९९ झाली आहे तर तालुक्यात कोरोंनाचे २७३ रुग्ण झाले आहेत तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात बुधवारी उरण मध्ये ४४ आणि पनवेल तालुक्यात १७ नवीन रुग्ण सापडले असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३९७ झाली असून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे मध्ये सेक्टर ८ महावीर वास्तू मध्ये रहाणारे पनवेल तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी कामोठे येथील मारुती धाम सोसायटीतील मेडिकल स्टोअर्स मध्ये नेहमी जात असत त्या सोसायटीत यापूर्वी दोघांना कोरोंनाची बाधा झाली होती. त्यांच्या पासून त्यांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. सेक्टर १७ मधील रिध्दी -सिध्दी दर्शन सोसायटीतल महिलेचे पती गोवंडी पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांना कोरोंनाची बाधा झाली होती त्यांच्या पासून तिला संसर्ग झाला आहे. सेक्टर ६ मधील अनंत वाटिका सोसायटीतील नायगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला कोरोंची लागण झाली आहे. सेक्टर १४ लेक व्हयू अपार्टमेंट मध्ये राहणार्‍या मुंबई महापालिकेत सफाई कामगार असलेल्या व्यक्तीला कोरोंनाची बाधा झाली आहे. सेक्टर 34 मधील मानसरोवर कॉम्प्लेक्स मधील महिलेला कोरोंनाची बाधा झाली असून तिच्या घरातील तीन व्यक्तीं यापूर्वी पॉझिटिव्ह आल्या आहेत.
खारघर मध्ये सेक्टर १० सेन सिटी सोसायटी राहणार्‍या मुंबईत माजगाव येथे बँक ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. सेक्टर ८ मधील भूमि हाईट्स मधील टाटा पॉवर मध्ये चेंबुरला अभियंता असलेल्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. सेक्टर २१ ज्ञानसाधना सोसायटीत राहणार्‍या धारावी बेस्ट आगारातील वाहकाला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे .खांदा कॉलनी सेक्टर ७ मधील व्हीजन सोसायटीत रहाणार्‍या १९ वर्षीय घाटकोपरला फार्मासिस्ट कंपनीत असणार्‍या तरुणाचा कोरोंना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा
नवीन पनवेल सेक्टर १५ गुलमोहर पार्क मधील वकील असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण भागातील उमरोली येथील पॉझिटिव्ह असलेल्या नातेवाईयांच्या संपर्कात असल्याने संसर्ग झाला . बुधवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १५७३ जणांची कोरोंनाची टेस्ट केली आहे. त्यापैकी २७ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोंना पोझिटीव्ह पैकी १०४ जणांवर उपचार सुरू असून ८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता पर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज कोरोंनाचे २ रुग्ण बरे झाल्याने त्यान घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल ग्रामीण मध्ये बुधवारी नेरे येथील रिव्हर साईड ग्रीन सोसायटीतील एकाच कुटुंबाती ५ जणांना कोरोंनाची बाधा झाली असून त्यामध्ये ५ वर्षापासून ७० वर्षापर्यंतच्या व्यतींचा समावेश आहे. या कुटुंबातील जेष्ठ नागरिक मुंबईहून नेरेला आले होते. त्याच्या पासून संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे. उलवे येथील सेक्टर ५ आणि २१मधील प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोंनाची बाधा झाली आहे.यापैकी एक नवी मुंबईच्या ए.पी.एम.सी मार्केट मध्ये काम करत असून दुसरी व्यक्ती परळ येथे मुंबई बँकेत काम करीत आहे . आतापर्यंत ग्रामीण मध्ये कोरोंनाचे ७४ रुग्ण झाले असून ११ जण बरे झाले असून ६१ जणांवर उपचार सुरू आहेत
. रायगड जिल्ह्यात कोरोंनाचे दिवसभरात आढळले ६१ नवीन रुग्ण उरणमध्‍ये एकाच दिवशी ४४ नवे रूग्‍ण सापडल्याने उरण तालुक्याने शंभरी पार केली असून आतापर्यंत उरणमध्ये १०५ झाले असून सलग ४ दिवसात ९७ रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्‍हयातील कोरोनाबाधितांची संख्‍या ३९७ झाली आहे