Monday, June 1 2020 2:24 pm

रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचं अपघातात निधन

रायगड -: रायगडमधील  महाड MIDC जवळ रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे त्यांच्या गाडीला  रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र कालगुडेंचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महाड MIDC पोलिस ठाण्यांमध्ये जमा झाले असून संबंधित कंपनी मालक कंपनी व कटेनर चालकांवर तीनशे दोन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

गुन्हा  दाखल केल्याशिवाय मृतदेहाचे पोस्टमॉर्टम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बिरवाडी महाड वसाहत महाड शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.