ठाणे फ्रेंड्स ऑफ बीजेपी चा वतीने 30 फूट प्रतिकृती साकार
ठाणे 20 : राम मंदिराच्या उद्घघाटनाच्या निमित्ते संपूर्ण देश राममय झाला आहे. त्या अनुषंगाने खारकर आळी नाका, पोलीस स्कुल समोर ठाणे येथे प्रभु श्रीरामांची ३० फुट उंचीची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. तसेच सांयकाळी ५ वाजता भजन, ५.३० वाजता ढोलताशा पथकाच्या माध्यमातून आवाज घुमणार असून मिरवणुक काढली जाणार आहे. याशिवाय सांयकाळी ७ वाजता महाआरती सम्राट गजानन प्रधान यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर ८ वाजता कारसेवकांचा सत्कार आणि ८.३० वाजता शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन फ्रेंड्स ऑफ बीजेपी ठाणे लोकसभा संयोजक निलेश कोळी यांनी केले आहे.