मुंबई ३०: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि राजा म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. अयोध्येतही श्रीरामाचे अतिशय सुंदर असे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी आम्ही लवकरच तिथंही जाणार आहोत.रावणाचा संहार करणाऱ्या आणि राक्षसी प्रवृत्तींना नेस्तनाबूत करणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणतात.