Friday, May 24 2019 8:21 am

राफेलची कागदपत्र चोरी झालीच नाहीत :-केके वेणुगोपाल

नवी दिल्ली : बुधवारी राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी महाधिवक्ते केके वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. परंतु राफेल कराराची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत, तर त्याची फोटोकॉपी काढण्यात आली असल्याचे  बोलून वेणुगोपाल यांनी यु-टर्न घेतला आणि  वेणुगोपाल म्हणाले की, ‘माझ्या बोलण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला आहे.’
 ” सुप्रीम कोर्टात प्रशांत भूषण आणि यशवंत सिन्हा यांनी राफेल करार संदर्भाच्या कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या. ही कागदपत्रे गोपनीय होती, परंतु या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली.” असे  वेणुगोपाल म्हणाले.
दरम्यान वेणुगोपाल यांनी राफेल करारासंदर्भातली कागदपत्रे चोरीला गेल्याचे भाष्य केल्यानंतर विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरु केले आहे. त्यानंतर आता महाधिवक्ते केके वेणुगोपाल यांनी कागदपत्रे हरवली नसल्याचे म्हटले आहे