Monday, June 1 2020 1:29 pm

“राणेंच्या हकालपट्टीची” मागणी – भाजपाचे नेते प्रमोद जठार.

सिंधुदुर्ग-: भाजपाचे सिंधुदुर्गातील नेते प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्यावी, अशी भाजपाच्या प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे पत्राद्वारे “राणेंच्या हकालपट्टीची” मागणी केली आहे.

नारायण राणेंनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्या नंतर  त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील केला. त्यानंतर भाजपानं आपल्या आपल्या पक्ष कोट्यातून त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं. सध्या भाजपाच्या कोट्यातून नारायण राणे राज्यसभेवर खासदार आहेत. स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेदरम्यान नारायण राणे जाणूनबुजून भाजपाला लक्ष्य करत असल्याच्या कारणा मुळे भाजपा नेत्यांमध्येच नारायण राणेंबद्दल दुभागिकरण वाढत आहे.
भाजपामधूनच राणेविरोधी वातावरण निर्मिती झाल्यामुळे त्यांची खासदारकीवरून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिंधुदुर्गच्या नेत्यांच मत आहे.