Monday, January 27 2020 9:36 pm

राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा होत आहे. त्यांच्या या सभेला राज्यातील भाजपविरोधी पक्षांकडून मागणी वाढत आहे. असे असताना आता राज ठाकरे यांच्या सभेला कर्नाटकातूनही मागणी आहे.कर्नाटक विधानसभेचे प्रतोद आमदार गणेश हुक्केरी यांचे वडील लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या या सभेसाठी निपाणी येथे सभा व्हावी, यासाठी गणेश हुक्केरी यांनी त्यांना पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेले हे पत्र मराठीमध्ये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून व्हिडिओच्या माध्यमातून मांडला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींनी दिलेली आश्वासनं आणि त्यानंतर घेतलेल्या सभा, मुलाखतींच्या आधारे राज ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेच त्यांच्या या सभा चांगल्याच चर्चेत आहे.