Monday, April 6 2020 2:50 pm

राज ठाकरेंनी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस प्रशासन , केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदन

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचं, कामाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.सरकारला उपाययोजना करायला थोडा उशीर झाला आहे, मात्र सरकारनं योग्य पावलं उचलल्याचं राज ठाकरे म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल फोनवर बोलणं झालं.  त्यांना काही सूचना देखील केल्या आहेत. सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे, मात्र देशांर्तगत विमान सेवा सुरु आहे, ती बंद करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.काही मुठभर लोकांना परिस्थिचीचं गंभीर्य कळत नाही. कालच बंद झाला, तो भारत बंद नव्हता, ती एक टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही, तर सरकारला गंभीर आणि कडक पावलं उचलावी लागतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं. सरकारकडून नागरिकांना घरी थांबण्याचं आवाहन करुनही दुसऱ्या दिवशी वाहनं रस्त्यावर आली, चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. असं का करताय असा सवाल राज ठाकरेंनी लोकांना विचारला.असं राज ठाकरेंनी विचारलं. काल थाळीनाद, घंटानादाला लोक एकत्र बाहेर जमले होते. कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चपर्यंत सरकारने लॉकडाऊन केलं असलं तरी लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते, असा अंदाजही राज ठाकरेंनी वर्तवला.