Friday, May 24 2019 9:45 am

राज ठाकरेंच्या आरोपाला संजय राऊत यांचा टोला !

मुंबई:
मुंबईतील विक्रोळी महोत्सवात राज ठाकरे बोलत असताना, युती सरकारवर घणाघात केला. नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लीम दंग्यांवर निवडणूक जिंकायची आहे, असा आरोप राज ठाकरेंनी युती सरकारवर केला आहे.
पुढच्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिरच्या मुद्यांवरुन दंगली घडविण्यासाठी ओवेसींसारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण या सरकारने गेली साडेचार वर्ष विकासकामे केली नाहीत. आणि त्यामुळे दाखवण्यासारखे काही नसल्याने या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लीम दंगली घडवून निवडणूक लढवायची आहे’, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. ‘राम मंदिर व्हायला पाहिजे, मात्र ते 2019 च्या निवडणुकीनंतर व्हायला पाहिजे. परंतु हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करायचे आणि मते मागायची हा एककलमी कार्यक्रम सध्या या सरकारचा असणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावध राहिले पाहिजे ’, असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला. ‘महाराष्ट्रात आणि देशात वाढलेली बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न असताना, देशाचे राजकारण भलत्याच विषयांकडे वळत आहे. ज्यामुळे मूळ प्रश्न बाजूला व्हावेत आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून पुन्हा सत्तेत यावे हा उद्देश या सरकारचा आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.
ह्याबाबत प्रतिक्रिया देताना ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत’ म्हणाले की, “राम मंदिरावरुन आता देशात कुठेही दंगली होणार नाहीत. जर कोणाला याबाबत काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे”, असे उत्तर राज ठाकरेंना टोला लगावला.