Monday, June 17 2019 4:06 am

राज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

काँग्रेसच्या योजना फक्त नाव बदलून राबवत आहेत. नवीन काय केलं ते सांगा , राज यांचा सवाल.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. काँग्रेस सरकार असताना मोदी आधार कार्डला विरोध करत होते आणि आता स्वतः सरकारमध्ये आल्यावर तेच आधारकार्ड योग्य कसे?? असा खडा सवाल राज यांनी विचारला.मोदी हे नवे एडॉल्फ हिटलर आहेत. जे हिटलरच्या काळात केलं गेलं तेच आता मोदी करत आहेत, असेदेखील राज म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईक , एअर स्ट्राईक झाला. त्यावेळी खुद्द अमित शहा म्हणाले , “250 दहशतवादी मारले गेले. शहिदांचा बदला आम्ही घेतला.” यावर राज म्हणाले की ,”शहा को-पायलट होते का या स्ट्राईकचे , नेमका आकडा कसा काय सांगू शकतात ” जर सेनादल प्रमुख सांगत होते की नक्की किती जण मारले गेले हे सांगणे कठीण आहे , मग सरकारला आकडा समजला कसा हे कोडे आहे. जनतेने याविषयी सरकारला प्रश्न केला तर त्याचे उत्तरदेखील दिले जात नाही हा अनेकांचा अनुभव आहे, असेदेखील राज म्हणाले. “जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा मी मोदींचे चरण तीर्थ प्यावे असे म्हणत होतो , मग आता मी मोदींविरोधी वक्तव्य कसे करू शकतो” , असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यावे बोलताना राज म्हणाले , “सत्तेनंतर जर मोदी बदलू शकतात तर मग माझी भूमिका तशीच कशी राहिल, मोदी बदलले म्हणून मी माझी भूमिका बदलली.”
मोदी सरकार जनतेला फसवत आहे. ज्या गावाला डिजिटल गाव म्हणून दाखवले गेले तेथे लोकांना साधा फोन देखील वापरणे अशक्य आहे कारण तिथे मोबाइलला रेंज नाही आणि अनेकांचे अजून बँकेत खाते देखील नाही आहे. आतापर्यंत आपल्याला कधीच आपला पंतप्रधान निवडण्याची संधी दिली गेली नाही.असे वक्तव्य यावेळी राज ठाकरे यांनी केले.