Friday, December 13 2024 11:01 am

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करावेत

ठाणे,14 :- महाराष्ट्र शासनाचे निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी दि.1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेत सादर करणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याबाबत आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत यादीतील आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी. तसेच या यादीत आपले पॅन कार्ड, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी, शिवाय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी पुनःश्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्विकारली नाही, याबाबतची माहिती बँकाकडे सादर करावी अन्यचा माहे डिसेंबर 2024 चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच संबंधित बँक व्यवस्थापकांनी निवृत्ती वेतनधारकांच्या यादीमध्ये दि.1 डिसेंबर 2024 पूर्वी सर्व 1 हजार 3 निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची स्वाक्षरी होतील याची दक्षता घ्यावी. हे दाखले दि.1 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत बँकेत स्वाक्षरीसाठी उपलब्ध राहतील, असे ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक संवर्ग) महेशकुमार कारंडे यांनी कळविले आहे.