Tuesday, July 23 2019 11:05 am

 राज्य मंत्रिमंडळ विस्तारात १३ आमदरांनी घेतली शपथ

मुंबई : अखेर आज राज्यातील  13 आमदारांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेतली. या नव्या  मंत्रिमंडळ  भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे माजी नेते जयदत्त क्षीरसागर, काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील  यांचाही नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांमध्ये सहभाग आहे.  यावेळी सर्वप्रथम   कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर  राज्यमंत्री  यानी शपथ घेतली.

राजभवनाच्या प्रांगणात सोहळची सुरुवात  राष्ट्रगीताने झाली. या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय,  नातेवाईक, कार्यकर्ते यांच्यासह यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह राज्य प्रशानातील अधिकारी उपस्थित होते.
राज्य मंत्रीमंडळात १३ आमदारांपैकी ८ आमदार हे कॅबिनेट मंत्री असतील, तर ५ आमदार हे राज्यमंत्री असतील यापैकी…….
कॅबिनेट मंत्री

1) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

2) जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

3) आशिष शेलार (भाजप)

4) संजय कुटे (भाजप)

5) सुरेश खाडे (भाजप)

6) अनिल बोंडे (भाजप)

7) तानाजी सावंत (शिवसेना)

8) अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

1) योगेश सागर (भाजप)

2) अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

3) संजय (बाळा) भेगडे (भाजप)

4) परिणय रमेश फुके (भाजप)

5) अतुल सावे – भाजप